Stocks
Loading live market data…

दाऊदशी संबंधित एनआयएने ताब्यात घेतलेल्याचा राज्यपालांनी केला होता सत्कार 

दाऊदशी संबंधित एनआयएने ताब्यात घेतलेल्याचा राज्यपालांनी केला होता सत्कार 

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित संशयावरून एनआयएने सोमवारी २९ ठिकाणी छापेमारी केली. यात सुहेल खंडवाणी, छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यातील सुहेल खंडवाणी यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी राजभवनात जाहीर सत्कार केला होता, अशी धक्कादायक माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी बेकायदेशीरपणे बसवलेले त्यांचे भ्रष्ट सचिव उल्हास मुणगेकर यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. मुणगेकर हे राजभवनातील ‘सचिन वाझे’ आहेत. त्यांनी अवैध मार्गाने कोट्यवधी रुपयांची काळी माया जमा केली आहे. त्यांची त्वरित चौकशी करण्यात यावी व त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार केली होती. मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी या भ्रष्ट मुणगेकर यांना कायम पाठीशी घातले आहे. 

राज्यपाल कोश्यारी यांना केवळ सत्कार समारंभ करण्यात रस आहे. ( प्रश्न सोडवण्यात नाही ) त्याचा फायदा घेवून मुणगेकर यांनी महत्वाचे प्रश्न, समस्या या राज्यपालांपर्यत कधीच पोहचू दिल्या नाहीत. त्या भ्रष्ट मार्गाने ‘मॅनेज’ केल्या. इतकेच नव्हे तर पैसे खावून गुंड, आरोपी, खंडणीखोरांना राजभवनात येण्यास परवानगी दिली. त्यांच्याच कृपेने राजभवनात अवैध पीएचडी वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला. याशिवाय अवैध पीएचडी देणारा मधू क्रिशन यांच्या काळ्या धंद्यातही मुणगेकर सामील आहेत, त्यामुळेच मधू याचाही राजभवनात राज्यपालाच्या हस्ते सत्कार झाला होता.

Your view

Join the conversation

Your email address will not be published. Required fields are marked.