उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स EXCLUSIVE

मणिपूरचे राज्यपाल ला गणेशन यांनी राजभवनातच स्वतः:च्या हाताने बोगस पीएचडी वाटप केल्याची धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (SIT) हाती पुराव्यासह लागली आहे.

मधू कृष्णा (Madhu Krishna) हा THE AMERICAN UNIVERSITY, USA या बोगस विद्यापीठाचा कुलगुरू आहे. या महाभागाने पाच ते सहा बोगस विद्यापीठांची स्थापना केलेली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनाही या भामट्याने बोगस पीएचडी देऊन गंडविले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही या भामट्याचा राजभवनात सत्कार केला. त्याच्याबरोबर ब्रेकफास्ट केला. हा भामटा व त्याच्या टोळीत असणारा Ranbir Singh Laishram याने राज्यपाल कोश्यारी यांच्याबरोबर चर्चाही केली.

राज्यपाल ला गणेशन स्वतःच्या हाताने पीएचडी देणार, या बहाण्याने या दोन भामट्यांनी कोट्यवधी रुपयांची काळी माया जमा केली. त्यानंतर राज्यपाल ला गणेशन यांच्या हस्ते नोव्हेंबर २०२१ मध्ये राजभवनात हा बोगस पीएचडी वाटण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची सर्व छायाचित्रे ‘स्प्राऊट्स’च्या हाती आलेली असून, निवडक छायाचित्रे प्रकाशित करण्यात आलेली आहेत.

मधू कृष्णा, त्याचा साथीदार Ranbir Singh Laishram यांनी आतापर्यंत हजारो जणांना बोगस पीएचडी विकल्या आहेत. या कुकर्मात त्यांना राजभवनात बेकायदेशीरपणे बसलेले राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचे भ्रष्ट सचिव उल्हास मुणगेकर यांचे छुपे सहकार्य आहे.

या सर्वांच्या कोट्यवधी रुपयांच्या अवैध संपत्तीची इडी, इन्कम टॅक्स, अँटी करप्शन ब्युरो आणि जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेन्टकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही अधिवक्ता दिलीप इनकर व Human Rights Protection and Awareness या संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी केली आहे.

वाचकांच्या आग्रहास्तव पुन्हा या बोगस विद्यापीठ व बेकायदेशीरपणे पीएचडी वाटप करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध करीत आहोत.

• ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, श्रीलंका,
• अमेरिका हवाई विद्यापीठ आणि आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,
• कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, टोंगा,
• युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ, अमेरिका,साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी
• अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए,
• झोराष्ट्रीयन युनिव्हर्सिटी,
• सॉर्बोन युनिव्हर्सिटी, फ्रान्स,
• महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन – (NGO)
• एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट – (NGO)
• नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी – NGO
• डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस – NGO
• मानव भारती विद्यापीठ (MBU), हिमाचल प्रदेश
• मानव भारती विद्यापीठ, सोलन
• विनायक मिशन्स, सिंघानिया.
• अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस
• छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर
• अमेरिकन हेरिटेज युनिव्हर्सिटी ऑफ साऊथन कॅलिफोर्निया (AHUSC)
• पीस युनिव्हर्सिटी
• ट्रिनिटी वर्ल्ड युनिव्हर्सिटी, युके
• सेंट मदर टेरेसा युनिव्हर्सिटी