उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
तुमच्याकडे असणाऱ्या मालमत्ता, संपत्तीपेक्षा जगातील कोणतीही बँक तुम्हाला अधिक कर्ज देत नाही, हा साधासरळ जागतिक नियम आहे. मात्र उद्योगपती गौतम अदानी यांना बँकांनी तारण ठेवलेल्या मालमत्तेपेक्षा कैक पटीने अधिक कर्ज दिलेले होते. हे सर्व कर्ज, गुंतवणूक ही एसबीआय, एलआयसी यांच्यासारख्या सरकारी बँक व संस्थांनी दिलेली होती.
अदानी यांचा धंदा जरी मोठा असला तरी तो टाटा (Tata), बिर्ला यांच्यासारखा परंपरागत नव्हता. तो नुकताच उभारलेला होता. अगदी २०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान पदाचे दावेदार असलेले उमेदवार व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी यांच्याच विमानाने भाजपचा निवडणूक प्रचार करीत होते. त्या विमानांवरही अदानी ग्रुपचा लोगो व नाव असे. मात्र त्यांच्या या मोदींवरील गुंतवणुकीचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणावर झाला. या निवडणुकीतील विजयानंतर अदानी यांनीही यांच्या बिझनेसनेही गगनभरारी घेतली.
निवडणुकीमध्ये भ्रष्ट उद्योगपतींची आर्थिक मदत घेणे, ही परंपरा भारतात दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी हेही त्यावेळी बिर्ला (Birla) सारख्या उद्योगपतींची मदत घ्यायचे, मात्र त्याचा मोदी यांच्याइतका अतिरेक नसे. आज मोदी यांच्या हव्यासापोटी भारताची अर्थव्यवस्थाच खिळखिळी होवू लागलेली आहे.
मोदी यांच्या इशाऱ्यावर सेबीचे (SEBI ) अधिकारीही डोलू लागलेले होते. अदानी हे बुडते जहाज आहे, असे या अधिकाऱ्यांना माहित असतानादेखील सेबीने (Securities and Exchange Board of India) अदानी यांना आयपीओ त्यानंतर एफपीओ काढायला परवानगी दिलेली आहे. एखादी कंपनी तोट्यात चालण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, हे जगजाहीर होते.
सेबीच्या अधिकाऱ्यांना तर हे चांगलेच ठाऊक होते, अशा परिस्थितीत सेबीने या आयपीओ, एफपीओ काढायला बंदी घालायला होती, मात्र लाचखोर सेबी अधिकाऱ्यांनी अदानी यांच्याशी आर्थिक संधान बांधलेले होते. त्यामुळेच महाभ्रष्ट सेबीने अदानी यांच्या भ्रष्ट मार्गाला साथ दिली. अर्थात त्यामुळे लाखो गुंतवणूकदाराचे नुकसान झाले आणि भारताच्या अर्थव्यवस्थेलाच तडे गेले.
अदानी त्यांच्यासारखीच पेटीएम (Paytm) नावाची कंपनी होती. ही कंपनी तोट्यात चालणारी होती, त्यामुळे खरेतर सेबीने पेटीएमच्या आयपीओला परवानगी नाकारायला हवी होती. मात्र सेबीच्या अधिकाऱ्यांनी पेटीएमचे अधिकारी विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांच्याशी आर्थिक हातमिळवणी केलेली होती. त्यामुळे लाखो ग्राहकांची फसवणूक झालेली होती, हा देशातील मोठा आर्थिक महाघोटाळा आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्प्राउट्स एसआयटीने त्यावेळी केलेली होती.
इतकेच नव्हे तर सेबीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पितळ उघडे करणारे दोन स्पेशल रिपोर्टही १९ नोव्हेंबर व २० नोव्हेंबर २०२१ या ‘स्प्राऊट्स’च्या अंकात प्रसिद्ध केलेले होते. Untrustworthy SEBI, gives Paytm free hand व multy crore scam in Paytm हे रिपोर्ट्स स्प्राऊट्सच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. मात्र दुर्दैवाने हा महाघोटाळाही दाबण्यात आला. आजही हेच सेबीचे अधिकारी मोकाट फिरत आहेत, आणि अदानी नावाच्या भामट्याला छुपी साथ देत आहेत.