राज्यपालांनी केला होता सत्कार

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया( एलआयसी) या प्रख्यात इन्शुरन्स कंपनीच्या एजंटने ‘एलआयसी’च्या बुरख्याआडून चक्क अवैधपणे सावकारी सुरु केली होती. जवळपास ३० वर्षांहून अधिक काळ हा अवैध सावकारी करीत असे. याशिवाय त्याने मुंबईच्या कांदिवली येथे जी. पी. फायनान्स नावाची कंपनी स्थापन केली आहे. येथून तो अवैधपणे कोट्यवधी रुपयांचे कर्ज देत असे व त्याची वसुलीही पठाणी पद्धतीने करीत असे. इतकेच नव्हे तर हा एजण्ट ग्राहकांकडून कोरे चेक, प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स, स्टॅम्प पेपर व इतर डॉक्युमेंट्स कर्ज देण्याअगोदरच घेत असे व त्याआधारे त्यांना ब्लॅकमेलिंग करीत असे.

राजेंद्र बंब असे या एजन्टचे नाव असून तो धुळे जिल्ह्यात अवैध सावकारी करीत असे. बंब याच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी धाड टाकली. आतापर्यंत या धाडीत तब्बल १८ कोटी ४२ लाख रुपयांची रोकड व १५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. याशिवाय ३८ कोरे चेक, १०४ खरेदी खत, १३ सौदा पावत्या, ३३ कोरे मुद्रांक आणि २०४ मुदत ठेवीच्या पावत्या याशिवाय सोन्याची बिस्किटे, चांदी, विदेशी चलन ही यावेळी सापडले. त्यांची जवळपास १५ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे.

बंब याचा हा धंदा फार जुना आहे. यापूर्वी त्यांच्याविषयी तक्रारी यायच्या. मात्र स्थानिक पोलीस स्टेशन,सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींशी त्याचे असलेले ‘अर्थ’पूर्ण संबंध यामुळे त्याच्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई होत नसे.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनीही बंबला गौरविले
राजभवनात गुंड, चीटर इतकेच काय पण अंडरवर्ल्डशी संबंधित असणाऱ्यांनाही प्रवेश मिळतो. राज्यपाल कोश्यारी यांनी उल्हास मुणगेकर नावाच्या अधिकाऱ्याची सचिव पदी नेमणूक केलेली आहे. मुणगेकर यांची नियुक्ती ही बेकायदेशीर आहे. त्यांच्यावर यापूर्वीही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. याच मुणगेकर यांनी राजेंद्र बंबलाही लाच घेवून राजभवनात कार्यक्रम करायला परवानगी दिली. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०२१ रोजी कोश्यारी यांनी बंबचा सत्कारही केला.

राजभवनाच्या वेबसाईटवर राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो प्रेस रिलीजसह असतात. मात्र ‘स्प्राऊट’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला भ्रष्ट मुणगेकर व त्याचे बगलबच्चे चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे बंब याच्या घरी धाड पडल्यावर त्यांच्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ व प्रेस रिलीजही तात्काळ वेबसाइटवरून काढून टाकण्यात
( डिलीट ) आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.