उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

महाराष्ट्रात बोगस PhD विकून कोट्यवधी रुपयांची काळी माया जमविण्याचा गोरखधंदा चालू आहे, हे स्प्राऊट्सने सर्वप्रथम उघडकीस आणले. मात्र यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही अगदी लज्जास्पद बाब आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनाही इतरांसारखीच बोगस विद्यपीठाची Ph.D देवून गंडविण्यात आले, याचा भांडाफोड ‘स्प्राऊट्स’ने सर्वप्रथम केला. यामुळे राज्यासह देशभरात एकच खळबळ उडाली. या बोगस विद्यापीठाचा सर्वेसर्वा व कथित सायंटिस्ट मधू कृष्णा (Madhu Krishna) याने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर ब्रेकफास्ट केला. दुसऱ्या एका घटनेमध्ये राजभवनात बोगस पीएचडी वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या सर्वांचा भांडाफोड ‘स्प्राऊट्स’ने सर्वप्रथम केला. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही.

राजभवनातील ‘वाझे’
याउलट या बोगस लोकांना राजभवनात अनुमती देणाऱ्या राज्यपालांचे सचिव उल्हास मुणगेकर यांना पाठीशीच घातले आहे. राजभवनात गुंड व समाजविघातक लोकांना हेच मुणगेकर पैसे घेवून प्रवेश देतात, असा जाहीर आरोपही करण्यात आला. इतकेच नव्हे तर मुणगेकर हे राजभवनात बेकायदेशीरपणे सचिव पदावर बसलेले आहे. राजभवनात ते ‘सचिन वाझे’ त्यांच्यासारखेच पैसे गोळा करण्याचे काम करतात. त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ते दिलीप इनकर यांनी केली आहे.

राज्यपालाच्या अखत्यारीतील समस्याही होतात ‘मॅनेज’
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनाचे द्वार सर्वांसाठी खुले केले, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. मात्र त्यांनी शैक्षणिक किंवा इतर कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. त्यांना केवळ सत्कार, समारंभ यातच रस आहे. याचाच फायदा घेवून मुणगेकरांनी राज्यपालांच्या अखत्यारीतील घोटाळे पैसे घेवून ‘दाबण्या’चे काम केले, असा आरोपही ज्येष्ठ पत्रकार महेंद्र गावडे यांनी केला आहे.

गुन्हा नोंद करण्यासाठी मागितली परवानगी
राजभवनातील या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची दिशाभूल केली जात आहे. ही दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात यावा, यासाठी Human rights protection and awareness या संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांकडे परवानगी मागितलेली आहे.

वाचकांच्या आग्रहास्तव पुन्हा या बोगस विद्यापीठ व बेकायदेशीरपणे पीएचडी वाटप करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध करीत आहोत.

• ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, श्रीलंका,
• अमेरिका हवाई विद्यापीठ आणि आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,
• कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, टोंगा,
• युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ, अमेरिका,साऊथ वेस्टर्न अमेरिकन
युनिव्हर्सिटी
• अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए,
• झोराष्ट्रीयन युनिव्हर्सिटी,
• सॉर्बोन युनिव्हर्सिटी, फ्रान्स,
• महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन – (NGO)
• एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट – (NGO)
• नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी – NGO
• डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस – NGO
• मानव भारती विद्यापीठ (MBU), हिमाचल प्रदेश
• मानव भारती विद्यापीठ, सोलन
• विनायक मिशन्स किंवा सिंघानिया.
• अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस
• छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर
• अमेरिकन हेरिटेज युनिव्हर्सिटी ऑफ साऊथन कॅलिफोर्निया (AHUSC)
• पीस युनिव्हर्सिटी
• ट्रिनिटी वर्ल्ड युनिव्हर्सिटी, युके
• सेंट मदर टेरेसा युनिव्हर्सिटी