निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा निर्णय
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात सोनई गावाजवळ शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी केवळ भारतातूनच नव्हे तर देशविदेशातून दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी व त्याची अवकृपा दूर व्हावी, यासाठी शनिमंदिरातील चौथऱ्यावर जावून त्याला तेलाचा अभिषेक करतात. या अभिषेकाला धार्मिक दृष्टीने प्रचंड महत्व असून ही हिंदू धर्मातील प्राचीन परंपरा आहे.
सध्या या तीर्थस्थानाचा कारभार ‘श्री शनैश्चर देवस्थान ट्रस्ट’ पहाते. या ट्रस्टमधील विश्वस्त मंडळाने भाविकांच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ५०० रुपयांची देणगी पावती फाडणाऱ्या भाविकालाच शनीला तेलाचा अभिषेक घालण्याची परवानगी मिळणार आहे. या नव्या निर्णयामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे.
विश्वस्त मंडळाचा हा निर्णय गरीब व श्रीमंत यांमध्ये भेदभाव निर्माण करणारा आहे. भगवंत व भाविक यांच्यामध्ये बाधा निर्माण करण्याचा कोणताही अधिकार विश्वस्त मंडळींना नाही. खऱ्या अर्थाने भाविकांची ही आर्थिक लुबाडणूक आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने ‘स्प्राऊट्स’शी बोलताना केला आहे.
“विश्वस्त मंडळाने मंदिराचे पावित्र्य जपावे. त्याच्या मूळ घटनेत बदल करू नये व कोणत्याही परिस्थितीत त्याला व्यवसायाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न करू नये, तसेच तेलाचा अभिषेक करण्यासाठी शुल्क लादण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा त्याला कडाडून विरोध केला जाईल.”
Sunil Ghanwat
सुनील घनवट
महाराष्ट्र, छत्तीसगड संघटक
हिंदू जनजागृती समिती