Probe Mumbai Bank Directors’ Rags to Riches Story
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
मुंबै बँकेच्या २१ संचालकांची संपत्ती ही कोट्यवधी रुपयांची आहे. या संचालकांनी बँकेच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी असणारी संपत्ती व आताची संपत्ती यात कित्येक पटीने अधिक वाढ झालेली आहे, या सर्व प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ‘स्प्राऊट्स’च्या टीमने केलेली आहे.
काही अपवाद वगळता इतर सर्व संचालकांचा कोणताही ठोस उत्पन्नाचा स्रोत नसताना त्यांनी या बँकेत कोट्यवधी रुपयांचा कथितरित्या भ्रष्टाचार केलेला आहे. यामध्ये जगातील श्रीमंत मजूर म्हणून मानले जाणारे प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचाही विशेष सहभाग आहे. भ्रष्टाचार करण्यात ते ‘प्रवीण’ आहेत. प्रसाद लाड (Prasad Lad) हेही या बँकेवर संचालक आहेत.
हे सर्व महाभ्रष्ट आहेत. या सर्व २१ संचालकांची आयकर विभागाने (income tax ) त्वरित चौकशी करावी, अशी विनंती ‘स्प्राऊट्स’च्या वतीने करण्यात येणार आहे. स्प्राऊट्सच्या या मागणीला आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) प्रवक्ते धनंजय शिंदे (Dhananjay Shinde) यांनीही दुजोरा दिलेला आहे. यासंबंधी लवकरच ईडीकडे तक्रार करण्यात येणार आहे, असेही शिंदे यांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना सांगितले.
प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने (EOW ) नुकतीच क्लीन चिट दिलेली आहे. ही क्लीन चिट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis ) यांच्या इशाऱ्यावरून झालेली आहे, हे जगजाहीर आहे. मात्र त्याची उच्च न्यायालयामार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना उच्च न्यायालय व देवाच्या अंतिम न्यायालयात कधीही क्षमा नाही, याचे त्यांनी भान राखावे.
प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांची संचालकपदी झालेली नेमणूक ही बेकायदेशीररितीने झालेली आहे. या बेकायदेशीर निवडणुकीला लवकरच मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. या बँकेचा वकील अखिलेश मायशंकर चौबे हा तर टॅक्सचोर आहे. त्याने दरेकर यांचे तळवे चाटत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गोळा केली आहे. यासंबंधीच्या बातम्या स्प्राऊट्सने (Sprouts) प्रसिद्ध केलेल्या आहेत.
घोटाळेबाज बँक, जगातील ‘श्रीमंत मजूर’ व टॅक्सचोर वकिलाची ‘स्प्राऊट्स’ला पुन्हा नोटीस
‘स्प्राऊट्स’च्या या बातम्यांमुळे प्रवीण दरेकर व त्यांचे बगलबच्चे खवळून उठले. यासंबंधी स्प्राऊट्सच्या संपादकांना आतापर्यंत दरेकर, बँक व टॅक्सचोर वकील चौबे यांनी पुन्हा नोटीस पाठविल्या आहेत. हा तर कायदेशीरपणे मानसिक खच्चीकरण करण्याचे षडयंत्र आहे. मात्र कितीही दबाव टाकला तरी माफी मागायला, अग्रलेख मागे घ्यायला, ‘स्प्राऊट्स’चे संपादक म्हणजे ‘लोकसत्ता’चे (Loksatta) गिरीश कुबेर (Girish Kuber) नाहीत, हे संबंधितांनी लक्षात ठेवावे.
चाळीतले टॉवरमध्ये
काही संचालकांचा अपवाद वगळता बहुतांशी संचालक हे सुरुवातीच्या काळात चाळीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. आज हेच संचालक या बँकेतील सभासदांच्या जीवावर टॉवरमधील ४ बीएचकेच्या फ्लॅटमध्ये राहत आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.
वाचकांच्या बळावर ‘स्प्राऊट्स’ या विश्वसनीय इंग्रजी वृत्तपत्राची घोडदौड चालू आहे, याचा आम्हाला आभिमान आहे, हे अत्यंत विनम्रपणे सांगावेसे वाटते.