विश्‍वस्त व धर्मादाय आयुक्त यांचे अर्थपूर्ण संबंध

 

लॉकडाऊनमध्ये बोगस बिलांनी गाठला उच्चांक
कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना सहा लाख वह्यांचे वाटप
विश्‍वस्त व धर्मादाय आयुक्त यांचे अर्थपूर्ण संबंध

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टमध्ये विश्वस्त व धर्मदाय आयुक्त यांच्या आर्थिक देवाणघेवाणीतून आजतागायत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी) हाती आली आहे.

या ट्रस्टची स्थापना १७ फेब्रुवारी १९४६ रोजी झाली. आजमितीला या ट्रस्टच्या २५ शाखा असून २९ हजारपेक्षा अधिक सभासद आहेत. यादव समाजातील समाजबांधवांसाठी ही संस्था कार्यरत आहेत. या संस्थेमध्ये आजतागायत १०० कोटींहून अधिक रकमेचा कथित भ्रष्टाचार झाल्याचे स्प्राऊट्सच्या एसआयटीला आढळून आले आहे.

या ट्रस्टमध्ये होणाऱ्या निवडणुका या नियमबाह्य पद्धतीने लढविल्या जातात. त्यामुळे ठराविक भ्रष्ट पदाधिकारी प्रत्येक वेळी निवडले जातात. या पदाधिकाऱ्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता, त्यांची कागदपत्रे सभासदांसमोर आणली जात नाही. इतकेच नव्हे तर ट्रस्टच्या मालकीचे दादर येथे सभागृह आहे. या सभागृहाच्या भाड्यामधून मिळणाऱ्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो, असा आरोप संस्थेच्या माजी विश्वस्त संदीका वाझे यांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना केला.

लॉकडाऊनच्या अगदी सुरुवातीच्या काळात रस्त्यावर माणसेच काय, पण चिटपाखरूही फिरत नव्हते. अर्थात या कडकडीत लॉकडाऊनच्या काळात शाळाही संपूर्णतः बंद होत्या. याच काळात ट्रस्टने साडेसहा लाख विद्यार्थ्यांना वह्यावाटप केले. अडीच लाख रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली. एवढेच नाही तर तब्बल १ लाख २७ हजार रुपयांचा खर्च केवळ चहावर करण्यात आला व त्याची खोटी बिलेही मंजूर करून लाटण्यात आली.

“महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टमध्ये आतापर्यंत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत धर्मदाय आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र या तक्रारींची कोणत्याही स्वरूपात दाखल घेण्यात आली नाही. याशिवाय माहितीच्या अधिकारातून माहिती मागितली असता, तीसुद्धा दिली जात नाही.”

संदीका वाझे,
माजी विश्वस्त