उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
गुंतवणूकदारांनी गुंतवणूक कुठे करावी, असे सल्ले देणाऱ्या मुंबईतील एका भामट्याने मोठ्या प्रमाणात शेल कंपन्या उघडल्या आहेत. या शेल कंपन्यांद्वारे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. या कंपन्यांचे डायरेक्टर्स अनिल चंदनमल सिंघवी व त्याची पत्नी निशी अनिल सिंघवी यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
चार्टर्ड अकाऊंटंट असणाऱ्या सिंघवी यांच्या कथित घोटाळ्यासंबंधीची सखोल माहिती ‘स्प्राऊट्स’च्या ३० नोव्हेंबर २०२१ रोजीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर ‘इडी’ने कडक पाऊले उचलली. या चौकशीला घाबरून सिंघवी यांनी त्यांच्या सुबेक्स या कंपन्यांचे १० लाख रुपयांचे शेअर्स एका रात्रीतच १० करोड रुपयांना विकले. हा व्यवहार संपूर्णतः संशयास्पद आहे. यासंबंधीच्या तक्रारी संबंधित विभागाला करण्यात आल्या. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
सिंघवी व त्यांच्या कॉर्पोरेट कंपनीने केलेले कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार, आर्थिक घोटाळे यांचा ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने सातत्याने पाठपुरावा केला व त्यासंबंधीच्या बातम्याही ‘स्प्राऊट्स’मधून प्रसिद्ध केल्या. यावर धास्तावलेल्या सिंघवी यांनी ‘कमल सिमेंट’ या कंपनीच्या लेटरहेडवरून स्प्राऊट्सचे संपादक उन्मेष गुजराथी यांना नोटीस पाठवली, इतकेच नव्हे तर या ऍक्टिव्हिजमध्ये तुम्ही लक्ष घालू नका, असेही लिहून त्यांच्यावर कायदेशीर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
‘कमल सिमेंट’ या कंपनीच्या लेटरहेडवर पाठवण्यात आलेल्या या नोटीसमध्ये आउटवर्ड नंबर नाही. इतकेच नव्हे तर मजकुरात श्री. दिग्विजय सिमेंट कंपनी लिमिटेडकडून ही नोटीस पाठवल्याचा उल्लेख आहे. या दोन कंपन्यांचा संबंध काय, याबाबत साशंकता आहे.
‘स्प्राऊट्स’ व तिची स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम अशा कोणत्याही दबावाला घाबरत नाही. यापूर्वीही असे अनेक प्रयत्न समाजकंटकांनी केले आहेत. ‘हिमालय’ या हर्बल प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीच्या प्रोडक्ट्चे बिंग फोडले म्हणून ‘स्प्राऊट्स’च्या संपादक या नात्याने माझ्यावर मुंबई हायकोर्टात १ हजार कोटी रुपयांचा दावा दाखल करण्यात आलेला आहे, तर ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कथित भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून यापूर्वीही मंडळाने माझ्यावर ३५० कोटींचा दावाही दाखल केला आहे.
सिंघवी यांच्या काही शेल कंपन्यांची लिस्ट प्रकाशित करत आहोत. या शेल कंपन्यांनी ४५० कोटींहून अधिक रकमेची जीएसटी चोरी केली असल्याचा संशयही स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने व्यक्त केला आहे. यासंबंधीच्या तक्रारीही इन्कम टॅक्स, सेबी, इडी व जीएसटी विभागाकडे करण्यात आलेल्या आहेत. त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी व त्याचे रजिस्ट्रेशन त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणीही या तक्रारीतून करण्यात आलेली आहे.
आर्थिक घोटाळे करण्याचा आरोप असणाऱ्या या काही शेल कंपन्या:
Subex Limited
Shree Digvijay Cement Co. Ltd.
I Can Investments Advisors Pvt. Ltd.
Assets Care and Reconstruction Enterprises Ltd.
Foundation For liberal and Management Education
Pathfinders Advisors Private Ltd.
Kidderpore Holdings Ltd.
Iias Research Foundation