उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
नवी मुंबई महानगरपालिकेवर मागील २५ वर्षांपासून गणेश नाईक व त्यांच्या नातेवाईकांचेच वर्चस्व आहे. यातूनच त्यांनी कोट्यवधी रुपयांचा कथित भ्रष्टाचार केला. या जोखडातून येथील नागरिकांची सुटका करण्यासाठी व त्यांना उत्तम नागरी सुविधा मिळण्यासाठी दस्तरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पावले उचललेली आहेत. ठाकरे यांनी पालिका उपायुक्तपदी अनुभवी व खमक्या अशा अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. मात्र त्यामुळे गणेश नाईक व त्यांच्या नातेवाईकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेत दरवर्षी होणार टेंडर घोटाळा सर्वांनाच माहिती आहे. याशिवाय येथे अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झालेला आहे. रस्त्याची गुणवत्ता निकृष्ठ आहे. रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांनी फुटपाथ आडवले आहेत. अशा असंख्य अवैध मार्गातून नाईक व त्यांच्या नातेवाईकांनी आजतागायत कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी पालिकेच्या उपयुक्तपदी डॉ. राहुल गेठे (MBBS, MD, PSM ) या उच्चशिक्षित व बेडर अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. यामुळे गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक हे चांगलेच धास्तावले आहेत.
याप्रकरणी गणेश नाईक, डॉ. राहुल गेठे यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता, तो होवू शकला नाही.
डॉ. राहुल गेठे यांची नियुक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः केली आहे. त्यामुळे ती रद्द करता येणार नाही.
अभिजित बांगर ,
आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका