उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित संशयावरून एनआयएने सोमवारी २९ ठिकाणी छापेमारी केली. यात सुहेल खंडवाणी, छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यातील सुहेल खंडवाणी यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी राजभवनात जाहीर सत्कार केला होता, अशी धक्कादायक माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी बेकायदेशीरपणे बसवलेले त्यांचे भ्रष्ट सचिव उल्हास मुणगेकर यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. मुणगेकर हे राजभवनातील ‘सचिन वाझे’ आहेत. त्यांनी अवैध मार्गाने कोट्यवधी रुपयांची काळी माया जमा केली आहे. त्यांची त्वरित चौकशी करण्यात यावी व त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार केली होती. मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी या भ्रष्ट मुणगेकर यांना कायम पाठीशी घातले आहे.