उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स EXCLUSIVE
एलआयसी या इन्शुरन्स कंपनीवर आजही कोट्यवधी ग्राहकांचा प्रचंड विश्वास आहे, काही प्रमाणात ते सत्यही आहे, मात्र याच विश्वासाचा फायदा घेवून कंपनीने तब्बल २ कोटी ग्राहकांना चुना लावण्याची धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी ) हाती आली आहे.
सन २००३ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करून एलआयसीने ‘जीवन सरल (With Profit ) टेबल नंबर १६५ ही पॉलिसी बाजारात आणली. २० ते ६० या वयोगटातील ग्राहकांसाठी ही पॉलिसी होती. या पॉलिसीतील माहितीपत्रकानुसार ग्राहकांनी गुंतवणूक केलेल्या रकमेवर त्यांना (मॅच्युरिटी पिरीएड्स) नंतर दुप्पट रक्कम मिळणार होती. या आकर्षक दाव्याला भुलून जवळपास ५ कोटी ग्राहकांनी ही पॉलिसी खरेदी केली. यातील २ कोटी ग्राहक हे ज्येष्ठ नागरिक होते.