सरकारची उदासीन भूमिका

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स संपादकीय

श्रीमंतीची स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात टोप्या घालणाऱ्या अ‍ॅम्वे इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड या मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनीवर १८ एप्रिल रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली होती. ईडीने कंपनीची ७५७.७७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

अ‍ॅम्वे ही कंपनी १९९८ साली भारतात आली. आजमितीला या कंपनीचे साडेपाच लाख डिस्ट्रीब्युटर्स भारतात आहेत. या डिस्ट्रिब्युटर्सच्या मार्फत १९९८ ते २०२२ या काळात अ‍ॅम्वेने अक्षरश: लाखो भारतीयांना गंडा घातला. या काळात अंमलबजावणी संचालनालयाने कोणतीच कारवाई केली नाही. अखेर उशिरा का होईना पण ईडीला जाग आली.

अ‍ॅम्वेसारख्याच इतरही शेकडो कंपन्याही नियमबाह्य पद्धतीने चालू आहेत. या कंपन्या मल्टि लेव्हल मार्केटिंग, पिरॅमिड स्कीम, रेफरल मार्केटिंग, नेटवर्क मार्केटिंग, चेन सिस्टीम या गोंडस नावाखाली कोट्यवधी ग्राहकांची फसवणूक करीत असतात. ही फसवणूक वर्षानुवर्षे चालू होती. अखेर भारत सरकारने २१ डिसेंबर २०२१ रोजी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अशा पद्धतीने विक्री करण्यावर बंदी घातली.

हा कायदा अस्तित्वात येवून आज वर्ष लोटले, तरीही या कंपन्या कायदा धाब्यावर बसवून राजरोसपणे ग्राहकांची लूट करीत आहेत. यावर सरकार मूग गिळून गप्प आहे. त्यामुळेच असे गोरखधंदे करणाऱ्यांचे जणू पेव फुटले आहे.

सरकारने अ‍ॅम्वेसारखीच कारवाई ओरिफ्लेम, मोदीकेअर, एमआय लाईफस्टाईल, टप्परवेअर, हेल्थलाईफ, वेस्टीज, आएएमसी, आरसीएम, हर्बललाईफ या कंपन्यांवर करून त्यांच्यावर बंदी घालायला हवी.

ग्राहकांना फसवणाऱ्या याच त्या फ्रॉड कंपन्या:

Amway

Modicare

Herbalife

Oriflame

Tupperware

RCM

IMC

Vestige

Forever Living

DXN

NASWIZ

AVON

ACN

Ambit Energy

Dewsoft Overseas

Blulife

Pampered Chef

Nu Skin

Belcorp

Mary Kay

Natura

Shaklee

Party Lite

Jewels By Park Lane